बालवाडी विभाग

एकञ कुटूंब पध्दती जाऊन विभक्त कुटूंब पध्दती अस्तित्वात आली. आणि आजी,आजोबांच्या संस्कारपासून मुले दूर जाऊ लागली. आजच्या धक्का धक्कीच्या जीवनात पालकांना मुलांच्या कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नाही. हे  तर इथले अंकूर म्हणून नका अव्हेर करु, उद्याचे कल्पतरु आम्ही उद्याचे कल्पतरु. ही साद बालक मंदिराच्या रुपात साकार झाली. ३ ते ५ या मुलांचा वयोगट इथे मुलांच्या बौध्दिक विकासा बरोबर त्यांच्या शारीरिक आणि भावनिक विकास  महत्त्वाचा मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल.  याचा विचार होऊन गुरुपौर्णिमा २ जुलै १९८५ रोजी बालवाडीची स्थापना भिलवडीतील महिला मंडळ सदस्य सौ. निर्मला देशपांडे, सौ. सुनिता चितळे व सर्व महिला मंडळ सदस्या यांनी त्यावेळीचे भिलवडीचे सरपंच रघुनाथ(भाऊ) देसाई यांच्या हस्ते स्थापना झाली. यावेळी श्रीफळ व    पान सुपारी देऊन सौ.जयश्री कुलकर्णी या बाईची निवड झाली. यावेळी बालवाडी मध्ये ३० मुलांचा वर्ग सुरु झाला. पुढे मुलांची संख्या वाढल्यामुळे पुढील महिन्यात सौ.कांचन शिंदे(बाई) यांची निवड झाली. पुढे मुलांची संख्या ४० ते ४५ या दरम्यान झाली. यावेळी बाईना मदतीसाठी महिला मंडळातील सदस्या येत होत्या.सन जून १९८६  रोजी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मा.डॉ.वासुदेव गोसावी व सर्व संचालक मंडळ  यांनी ही बालवाडी  भिलवडी शिक्षण संस्थेला जोडली. व या बालवाडीचे नामकरण कै.डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी असे झाले. अशा पध्दतीने बालवाडी वर्ग राममंदिर भिलवडी येथे सुरु होते.  यानंतर दरवर्षी बालवाडीच्या विकासाचा  आलेख उंचावत गेला. बालवाडीतील मुलांची संख्या व उपक्रम वाढत गेले. सन १९९४/९५ या दरम्यान बालवाडी चे वर्ग  राममंदिर मधून भिलवडी शिक्षण संस्थेच्या इमारतीत आली. व मुलांचे गट १ व गट २ असे वयोगटानुसार वर्गीकरण झाले. बालवाडीला  सन २०१०/११ या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. यावेळी  रौप्य महोत्सावी  वर्षानिमित्त बालवाडीमध्ये दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. आशा थोर आई बाबा साठी, आई बाबा मतदान हा कार्यक्रम घेतला. यावेळी संस्थेचे संचालक श्री.जोग सर,मगदूम सर, सचिव कवडे सर या कार्यक्रमास उपस्थित होते. याचवेळी स्काऊड गाईड अंतर्गत बनी टमटोला अभ्यासक्रम २० मुलांचा वर्ग सुरु केला. अशा प्रकारे शाळेत विविध उपक्रम,अभ्यास व सण उत्सव यांनी बालवाडी सजलेली व नटलेली आहे. अशा पध्दतीने  संस्कारक्षम  मुले बालवाडीत तयार होत आहेत.