Co-Curricular 
बनी उत्सव साजरा (कै.प्रकाश गोसावी बालवाडी)

भिलवडी  February 28,2020

  

बनीटमटोला :- याचा अर्थ टमटोला हे गटाचे नाव व बनी हा त्याचा लीडर होय .

 

या बनीटमटोला मध्ये 4 ते 6 वर्षाच्या बालकांचा समावेश होतो हे त्याचे वय आपण त्यांच्यावर संस्कार करण्याचे असते . त्यामुळे आपण जसे त्यांच्यावर संस्कार करतो तसे ते संस्कार रुजतात या वेळी बालकांचे मन एक कोरी पाटी असते . आपण जे त्याच्यावर लिहू त्याचा ठसा त्यावर कायमचा उमटतो . त्यामुळे आपल्याला संस्कारक्षम नागरिक घडवता येतो. या सर्वाचा विचार होऊन आपल्या बालवाडीत बनीटमटोला हा अभ्यासक्रम कार्यरत आहे. त्यामध्ये बनीउत्सव या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या मा.श्रीमती सुशिला पां. जाधव(माजी शिक्षण विस्तार अधिकरी पंचायत समिती शिराळा) व सौ.सविता भोळे(जिल्हा संघटन आयुक्त,स्काऊड गाईड विभाग,सांगली) या उपस्थित होत्या. यावेळी मुलांनी बनीचे सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून गट -२ च्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाहुण्यांनी मुलांचे खूप कौतुक केले. यावेळी संस्थेचे संचालक डी.के. किणीकर सर यांनी मुलांचे  व बाईचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी बालवाडी/प्राथ. विभाग प्रमुख सौ.मनिषा भ.पाटील मँडम व शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद , सेवक उपस्थित होते.